- Advertisement -
नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आयशर कंपनीचा टेम्पो खारेगाव ब्रिज येथे कठडा तोडून खाडीमध्ये पडला होता.
तो कशेळी येथे पर्यंत वाहत आलेला असून, त्याच्यामध्ये ड्रायव्हर रमेश पंडित यादव (वय ४७), प्रतापगड, उत्तर प्रदेश हा होता. कशेळी येथील स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले असून परम हॉस्पिटल राबोडी या ठिकाणी त्याला दाखल करण्यात आले आहे. टेम्पो काढण्याचे काम चालू आहे.
- Advertisement -