घरताज्या घडामोडीsushant singh- सुशांत सिंह आत्महत्याप्रकरण बिहार विधानसभेत, सीबीआय तपासाची मागणी

sushant singh- सुशांत सिंह आत्महत्याप्रकरण बिहार विधानसभेत, सीबीआय तपासाची मागणी

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असून याप्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. याचपार्श्वभूमीवर बिहार विधानसभेत आरजेडीचे नेते तेजश्नी यादव यांनी सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची भूमिकाही विरोधी असल्याचा आरोप बिहारचे मंत्री जय सिंह यांनी केला आहे.

सुशांतचे वडील के के सिंह यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. यात सुशांतच्या आत्महत्येसाठी रिया व तिचे कुटुंबीय जबाबदार असल्याबरोबरच अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे बिहार पोलिसांची टीम पुढील तपासासाठी मुंबईत आली आहे. मात्र त्यास मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहार सरकारने केला आहे. त्यातच बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईत येताच महापालिकेने क्वारनटाईन केले. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. यावर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनीही नाराजी व्यक्त केली असून जे काही झाले ते योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी महाराष्ट्र सरकारबरोबर बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्यातच सध्या बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात इतर मंत्र्यांप्रमाणेच तेजस्वी यादव यांनीही सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -