घरमुंबईBird Flue : हुश्श्य! राज्यात बर्डफ्लू नाही; वन विभागाचे स्पष्टीकरण!

Bird Flue : हुश्श्य! राज्यात बर्डफ्लू नाही; वन विभागाचे स्पष्टीकरण!

Subscribe

देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन राज्याच्या वन विभागाने केले आहे. या क्षणापर्यंत राज्यात कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही, असे मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशात काही कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळली आहेत. केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही बर्ड फ्ल्यूचा फैलाव झालेला आहे. केरळमध्ये तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती (State Emergency) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

केरळमध्ये हाय अलर्ट!

केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील १५०० पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होतो. माणसांनाही याची लागण होऊ शकते. महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात २००६मध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला होता. यावेळी हजारो कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती.

तर, पशूसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा!

दरम्यान, मंत्री सुनील केदार यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू साधर्म्य असणारी लक्षणे असलेल्या काही कोंबड्या सापडल्याची चर्चा आहे. वास्तविक त्यांना बर्ड फ्ल्यू झालेला नाही, असे सुनील केदार यांनी सांगितले. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत, असे सांगतानाच अन्य काही कारणाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -