घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे तुम्ही सीएम मटेरियल आहात! सुधीर मुनगंटीवार यांची टोलेबाजी

एकनाथ शिंदे तुम्ही सीएम मटेरियल आहात! सुधीर मुनगंटीवार यांची टोलेबाजी

Subscribe

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत नगरविकास मंत्री एकनिष्ठ शिंदे (Eknath Shinde)यांची प्रशंसा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्ही सीएम मटेरियल आहात, असे मुनगंटीवार शिंदे (Sudhir Mungantiwar) यांना उद्देशून म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानाची आज विधानभवनाच्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली.(BJP leader Sudhir Mungantiwar says Eknath Shinde is CM Materaial)
यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी आज केला. जवळपास १५ महिने उलटून या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची (सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका, असे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा- कांजूरमार्ग कारशेड डेपोला राज्य सरकारची तत्वतः मान्यता

 

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -