घरदेश-विदेशममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Subscribe

आशोल परिवर्तन घडवणार - मोदी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा २०२१ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद आणि शक्ती पणाला लावली आहे. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुक भाजपसाठी मात्र प्रतिष्ठेची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एन्ट्री केली आहे. निवडणुकींसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपने भव्य सभा आयोजित केली आहे. या सभेत भाषण करताना मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला आहे. बंगालमध्ये भ्रष्टाचारामुळे विकास थांबला असल्याचे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच भाजपला बहुमत दिल्यास तरुणांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या नागरिकांचे जे हिसकावलं आहे ते परत मिळवून देणार आहे. लोकांच्या हितासाठी आणि जनतेची कामे करण्यासाठी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सभेत हजेरी लावली. यावेळी ब्रिगेड मैदानवर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालला संबोधले आहे. सभेसाठी एवढी मोठी गर्दी मी पहिल्यांदाच पाहतो असल्याचे मोदींनी सभेत म्हटले आहे. जेव्हा हॅलिकॉप्टरवरुन पाहत होतो त्यावेळी सभेतील गर्दीत एकही जागा रिकामी नसल्याचे दृष्य पाहिले. पश्चिम बंगालच्या धर्तीवर आझादीसाठी अनेक युद्धे लढली आहेत. पश्चिम बंगालच्या महान व्यक्तिंनी सशक्त भारतासाठी योगदान दिले आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या लोकांनी ममता बॅनर्जींवर विश्वास दाखवला मात्र बॅनर्जी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला ममता बॅनर्जी सरकार आहे तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता आपली कंबर कसुन तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगालमध्ये आशोल परिवर्तन घडवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आशोल परिवर्तन घडवणार – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये आशोल परिवर्तन घडवणार असल्याची घोषणा केली. आशोल परिवर्तन म्हणजे असे बंगाल जिथे युवकांसाठी शिक्षण आणि रोजगाराची अनेक संधी उपलब्ध असलतील. एक असे बंगाल जिथून नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ येणार नाही. तसेच व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे पर्याय असतील. मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जातील अशी घोषणा मोदींनी पश्चिम बंगालमध्ये केली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमधल्या तरूणांसाठी, शेतकर्‍यांसाठी, बहिणी-मुलींच्या विकासासाठी आम्ही दिवसा तसेच चोवीस तास परिश्रम करू, आम्ही प्रत्येक सेकंद आपल्यासाठी जगू आपल्या स्वप्नांसाठी जगा तुमची सेवा करेल आपले आशीर्वाद घेईल आपले हृदय सेवा, समर्पण आणि परिश्रम यांच्याद्वारे प्रत्येक क्षणी जिंकेल. मी हे सांगण्यासाठी आलो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरसभेत म्हटले आहे.

जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे, तेव्हा बंगाल एक नवीन उर्जा, एक नवीन संकल्प घेऊन पुढे जाईल. देशाप्रमाणे पुढील २५ वर्षे बंगालच्या विकासासाठी खूप महत्वाची ठरणार आहेत. विधानसभा निवडणुका या २५ वर्षांच्या सुरूवातीस पहिला टप्पा विधानसभा निवडणुक आहे. पुढील ५ वर्षात बंगालचा विकास पुढील २५ वर्षांच्या विकासाचा आधार बनवेल. म्हणून, यावेळी तुम्ही फक्त बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठीच मतदान करणार नाही तर बंगालला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठीही मतदान कराल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -