‘टकाटक’ फेम अभिनेता अभिजित अमकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल ही जोडी लवकरच एक म्युझिक व्हिडिओ घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन उनाड उनाड’ असे या नव्या कोऱ्या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे. किरण कलकुंबे आणि विशाल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं मधुर शिंदे आदिती नेरूरकर यांनी गायलं आहे. सविता करंजकर जामले यांनी या गाण्याचे गीतलेखन केलं आहे.अतिशय नितळ काव्य, उत्तम संगीत आणि नेत्रसुखद छायांकनाचा आनंद या म्युझिक व्हिडिओतून प्रेक्षकांना घेता येईल. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तसेच बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आऊल स्टुडिओज या म्युझिक व्हिडिओचे प्रस्तुतकर्ते आहेत. मन उनाड उनाड या आगामी म्युझिक व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केले आहे. यासोबतच अनिकेत यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘मन उनाड उनाड’ या म्युझिक व्हिडिओमधील मुख्य अभिनेत्री मोनालिसा बागल ही झाला बोभाटा, भिरकीट, बेभान सोबतच वेगवेगळ्या अल्बम सॉंगमधून आपला अभिनय सादर केला आहे.
View this post on Instagram
तर अभिनेता अभिजित अमकर याने टकाटक, एक सांगायचंय असे धमाकेदार चित्रपट आणि विविध मालिकांमधून आपली छाप उटवली आहे.
हे वाचा- ७२ व्या ‘ब्रिटीश अॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स’ सोहळ्यात अभिनेता ऋषी कपूर,इरफान खानला वाहिली श्रद्धांजली