घरव्हिडिओटोपेंनी दिले खडसेंना आश्वासन

टोपेंनी दिले खडसेंना आश्वासन

Related Story

- Advertisement -

राज्यात काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियुक्ती करण्यात आलेल्या एम.बी.बी.एस. डॉक्टरांमुळे मागील दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या बी.ए.एम.एस.कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती ठिकाणाहून कार्यमुक्त व्हावे लागत आहेत. दरम्यान, बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले जाऊ नये, यासंदर्भात त्यांच्या संघटनेने निवेदन देऊन आपण आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधुन आम्हाला न्याय मिळवुन द्यावा अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी एकनाथ खडसे यांनी फोनवर चर्चा करुन कार्यरत असलेल्या सर्वच डॉक्टरांसोबत बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारच्या अडचणीच्या काळात राज्यात आरोग्य सेवा दिलेली आहे आणि कोविड प्रादुर्भाव पाहता भविष्यात या डॉक्टरांची आवश्यकता असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. त्यावर राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यररत असलेल्या एकही बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त होऊ देणार नाही, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एकनाथ खडसेंना दिले आहे.

- Advertisement -