घरव्हिडिओभाडेकरुंना हद्दपार करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध!

भाडेकरुंना हद्दपार करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध!

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आदर्श भाडेकरु कायदा मंजूर केला आहे. या कायद्याच्या विरोधात मुंबईमध्ये शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. या कायद्याविरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं केली. आदर्श भाडेकरू कायद्यात वर्षांनुवर्षे अल्प भाड्यात राहणाऱ्या भाडेकरूंकडून बाजारभावाने भाडे आकारण्याचे अधिकार चाळ वा इमारत मालकाला मिळणार असून, दोन महिने भाडे थकविल्यानंतर भाडेकरूला थेट घराबाहेर काढता येण्याची तरतूद या मसुद्यात आहे. दरम्यान, शिवसेनेने या कायद्याविरोधात मुंबईत आंदोलनं केली. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करू नये. तसेच हा कायदा तात्काळ हद्दपार करावा,” अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी करत दादरच्या शिवसेना भवन येथे आंदोलन केले.

- Advertisement -