घरव्हिडिओगुलाबराव पाटील यांच्या हस्ते भरड धान्य खरेदीस प्रारंभ

गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भरड धान्य खरेदीस प्रारंभ

Related Story

- Advertisement -

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगावात शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून आजपासून धान्य खरेदी सुरू करण्यात आली. खरेदी केंद्राचा शुभारंभ पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन एन. डी. पाटीलही उपस्थित होते. याप्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदीस प्रारंभ करण्यात आला. याच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७ खरेदी केंद्र असून ज्वारीसाठी २५ हजार ५०० क्विंटल, मकासाठी ६० हजार क्विंटल तर गहुसाठी २ हजार २४० क्विंटल खरेदीचे उद्दिष्टे मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्टे कमी पडत असल्याने वाढीव उद्दीष्टसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली आहे. शेतकर्‍यांनी धान्य खरेदी केंद्रांच्या सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -