घरदेश-विदेशकोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक, पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत किती...

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक, पण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत किती मुले झाली संक्रमित?

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट उसंती घेत नाही तोवर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ८५ टक्क्यांहून कमी झाली आहे. तर देशात ७५ दिवसानंतर आज रुग्णसंख्येत मोठी घट असून एकूण संसर्गामध्येही घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव सचिन लव अग्रवल यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ७ मे रोजी देशात ४ लाख १४ हजार १८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. पण आत्ता ६० हजार ४७१ नवे रुग्ण आढळून आलेत. देशातील १६५ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर उपचार घेत असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या आता १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे, तर देशात कोरोना रुग्णसंख्येचा रिकव्हरी रेट ९५.६ टक्क्यांवर गेला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दरातही लक्षणीय घट झाली आहे.

- Advertisement -

लहान मुलांना पहिली आणि दुसरी लाट किती धोकादायक ठरली?

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, अशी भीती केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य सल्लागाराने व्यक्त केली होती. यासंदर्भात लव्ह अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान १ ते १० वर्षे वयोगटातील फक्त ३.२८ टक्के मुलचं संक्रमित आढळली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान याच वयोगटातील ३.०५ टक्के मुलं संक्रमित झाली होती. तर ११ ते २० वयोगटातील ८.०३ टक्के मुलांना कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्ग झाला होता. तर दुसर्‍या लाटेत या वयोगटातील ८.०५ टक्के मुलांना संसर्ग झाला.

‘मुलांवर कोरोनाचा फारसा प्रभाव जाणवल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही’

तत्पूर्वी, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले की, जागतिक स्तरावर किंवा भारतात लहान मुलांचा तिसऱ्या लाटेता सर्वाधिक परिणाम जाणवेल असा कोणताही डेटा उपलब्ध नाही. रणदीप गुलेरिया यांनी आरोग्य मंत्रालयाच्यावतीने जाहीर पत्रकार परिषदेत म्हटले होते की, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटातही काही मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. परंतु ही लहान मुली खूप कमी आजारी पडली किंवा त्यांना आधीच काही आजाराने ग्रासले होते. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही लहान मुलांवर अधिक प्रभाव जाणवेल असे मला वाटत नाही. असेही डॉ. गुलेरिया म्हणाले.

- Advertisement -

YouTube व्हिडिओ पाहून बनवला बॉम्ब, मग डिफ्युज करण्यासाठी गाठले पोलीस स्टेशन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -