घरताज्या घडामोडीजास्त मुलांना जन्म देणाऱ्यांना मिळणार १ लाख रुपये; 'या' राज्यातील मंत्र्याने केली...

जास्त मुलांना जन्म देणाऱ्यांना मिळणार १ लाख रुपये; ‘या’ राज्यातील मंत्र्याने केली घोषणा

Subscribe

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान एका मंत्र्याने जास्त मुलांना जन्म देणाऱ्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मिझोरमचे क्रिडा आणि पर्यटन मंत्री रॉबर्ट रोमिया रॉयटे यांनी लहान मिझो समाजातील लोकसंख्येच्या वाढीस प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या मतदारसंघात सर्वात जास्त मुलं असलेल्या आई-वडिलांना १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

५४ वर्षी रॉयटे स्वतः तीन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत. त्यांनी फादर्स डे निमित्ताने ही घोषणा केली. पण मंत्र्याने बक्षीस मिळण्यासाठी मुलांची संख्या किती असावी हे सांगितले नाही. एनईसीएस (नॉर्थ ईस्ट कंसल्टेंसी सर्व्हिस)द्वारे बक्षीस रक्कम पुरस्कृत करेल. मिझोरमची लोकसंख्या घनता प्रति चौरस कि.मीमध्ये फक्त ५२ व्यक्ती आहे, तर राष्ट्रीय सरासरी प्रति चौरस कि.मीमध्ये ३८२ लोक आहेत.

- Advertisement -

एनईसीएमस एक खासगी संस्था आहे. जी याक्षेत्रातील प्रमुख फुटबॉल क्लब आयझोलची (एएफसी) अधिकृत प्रायोजक आहे. या क्षेत्रातील क्रिडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि एएफसीचे मालक रॉयटे आहेत. ते म्हणाले की, या पुरस्कारासाठी ज्याची निवड केली जाईल, त्याला एक प्रमाणपत्र आणि एक ट्रॉफी मिळेल.

रॉयटे यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच गेल्या वर्षी मिझोरमामध्ये खेळाला उद्योगाचा दर्जा मिळाला होता. ज्याचा उद्देश गुंतवणूकीकडे आकर्षित होऊन क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आहे. मिझोरम हे भारतातील पहिले राज्य आहे, जे राज्यात रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रिडाला एक उद्योग घोषित केले आहे.

- Advertisement -

दरम्यान वंध्यत्व दर आणि मिझोची लोकसंख्येचा घटता दर हा बऱ्याच वर्षांपासून एक गंभीर चिंता आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिल्यांदा सत्तारुढ मिझो नॅशनल फ्रंटमध्ये सामील झालेल्या रॉयटे म्हणाले की, कमी लोकसंख्या ही एक अतिशय गंभीर बाब आहे. तसेच लहान समुदाय किंवा जमातींचे अस्तित्व आणि प्रगतीसाठी एक मोठा अडथळा आहे.

काही दिवसांपूर्वी मिझोरमातील जगातील सर्वात मोठ्या कुटूंबातील प्रमुख जियोना चाना ऊर्फ जियोना-ए यांचे निधन झाल्यानंतर मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. जियोना-ए यांना ३८ पत्नी, ८९ मुलं आणि ३३ नातवंड आहेत. ७६ वर्षीय चाना १ हजारांहून अधिक सदस्यातील कुटुंबियांचे प्रमुख होते. १३ जूनला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. मिझोरम भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले दुसरे राज्य आहे. २०११च्या जनगणनेनुसार ११ लाख मिझोरमची लोकसंख्या आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -