बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. रोज नवे फोटो, किस्से, कविता ते शेअर करत असतात. ५० वर्षाहून अधिक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय असलेले अमिताभ बच्चन यांचा उत्साह तरुणांही लाजवेल असा आहे. यामुळे देशासह जगभरात बिग बींचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘बिग बीं’कडून चाहत्यांसाठी एक खास भेट देण्यात आली आहे. त्यांच देशभक्तीवर एक नवं गाणं रिलीज होणार आहे. यासंदर्भातील माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून दिली आहे.
या ट्वीटमध्ये बिग बींनी लिहिले की, यंदा स्वातंत्र्य दिनापूर्वी दोन दिवस आधी म्हणजे शुक्रवारी १३ ऑगस्टला हे नवं गाण रिलीज करणार आहोत. हे गाणं त्यांनी सर्व देशवासियांना समर्पित केलयं. तर दुसऱ्या नवं ट्वीट करत बिग बींनी लिहिले की, ना हरलो होतो, नाही हरणार… आम्ही हिंदुस्तानी. आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्वांसाठी एक नवं गाणं रिलीज करतोय. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवसआधी हे गाणं चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
T 3994 – Na Haare The Na Haare Hai .. #HumHindustani a song dedicated to all of you, from all of us .. Releasing this Independence weekend on 13th August .. #jaihind #humhindustani🇮🇳 pic.twitter.com/CbFE7lVzPe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 11, 2021
बिग बींनी या गाण्याचा एक व्हिडिओही आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओसह एक पोस्टर देखील त्यांनी पोस्ट केलायं. ज्यात आपल्या राष्ट्रीय तिरंगाच्या केशरी आणि हिरव्या रंगामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटो दिसतायत. या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह लता मंगेशकर, अल्का याग्निक, कैलाश खैर, सोनू निगम, श्रृति हसन, सोनाक्षी सिन्हा आणि श्रद्धा कपूर आहे. बिग बींचा हा नवा व्हिडिओ आत्तापर्य़त २० हजारांहून अधिक चाहत्यांनी पाहिला आहे.