घरमनोरंजन'C Section डिलीव्हरीवरून स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही,' उर्मिला निंबाळकरची भावनिक पोस्ट

‘C Section डिलीव्हरीवरून स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही,’ उर्मिला निंबाळकरची भावनिक पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि युट्युब स्टार उर्मिला निंबाळकरने नुकतचं एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर उर्मिलाने एक भावनिक पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गरोदरपणात स्त्रियांवर असलेल दडपण, नॉर्मलऐवजी सिझेरियन प्रसुतीमुळे अनेकदा स्त्रियांना दोष दिला जातो. पण सिझेरियन डिलीव्हरीदेखील नॉर्मल असल्याचे सांगत उर्मिलाने स्त्रियांना दोष देणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. सीझर डिलीव्हरीही तितकीच normal आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत. अशा आशयाची भलीमोठी पोस्ट उर्मिलाने केली आहे.

- Advertisement -

गरोदरपणात व्यायाम, आहाराची पथ्य पाळूनही नॉर्मल  डिलीव्हरीऐवजी सिझेरियन पर्याय़ निवडाला लागला असंही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये तिने तिच्या आरोग्याशी निगडीत काही कारणं देखील स्पष्टपणे सांगितली आहेत. उर्मिलाच्या या पोस्टवर कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अक्षया नाईकनेही उर्मिलाचे तिच्या भूमिकेविषयी कौतुक व्यक्त केलं आहे. उर्मिलाने तिच्या गरोदरपणाच्या काळात या विषयाशी निगडीत अनेक व्हिडिओ, फोटो शेअर केले आहेत. यावरुनही तिला अनेकांनी ट्रोल देखील केले.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘बिग बीं’कडून चाहत्यांना खास भेट! देशभक्तीवर नवं गाणं केल रिलीज


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -