घरताज्या घडामोडीपोलादपूर : झुलता पूल झाला इतिहासजमा, उरली केवळ आठवण...

पोलादपूर : झुलता पूल झाला इतिहासजमा, उरली केवळ आठवण…

Subscribe

२२ जुलैच्या पुराने या पुलाच्या आठवणीच शिल्लक ठेवल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात होणार्‍या पुराची तीव्रता किती असेल, असा प्रश्न केला की प्रत्येकजण पोलादपूरच्या झुलत्या पुलाकडे लक्ष वेधतात. पुराची तीव्रता मोजण्याचे ते एक साधन समजले जाते. या जिल्ह्याने असंख्य पूर पाहिले. आजवरच्या पुरांचा हा पूल म्हणजे जणू साक्षीदारच होता. २२ जुलैच्या पुराने या पुलाच्या आठवणीच शिल्लक ठेवल्या आहेत. या पुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की साठाव्या शतकातील हा झुलता पूलही वाहून गेला.

येथून ८ किलोमीटर अंतरावर गोपाळवाडीजवळ सावित्री नदीवर संपूर्ण लोखंडी जाळीचा १०० फूट लांबीचा भलामोठा पूल सावित्रीचे पात्र ओलांडण्यासाठी ६० च्या दशकात बांधण्यात आल्याच्या नोंदी आहेत. नदीच्या पलीकडील काठावर घागर कोंडवस्ती असून, अलीकडे पितळवाडी आहे. त्यावेळी पावसाळ्यात गावातील शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी, तसेच इतर कामासाठी जा-ये करण्यासाठी बांधण्यात आला होता. या पुलासमोर सावित्री नदीचा प्रवाह उंचावरून खाली खोलगट डोहात, रांजण खळग्यात कोसळताना पाहाण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात या पुलास मोठ्या प्रमाणावर आवर्जून भेट देत असत. पलीकडे जातेवेळी पूल हेलकावे खात असल्यामुळे बच्चे कंपनीसाठी झुलता पूल ही एक पर्वणीच होती. तर मोठ्यांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. धबधब्याचा आनंद झुलत्या पुलावरून घेणे हे पर्यटकांसाठी आकर्षणच होय. कधीकाळी या पुलावर मगरीही येऊन बसायच्या.

- Advertisement -

आता हे सारे आठवणीत साठवले जाणार आहे. कारण हा पूलही पुरात वाहून गेला. पुरामुळे पूल वाहून गेल्याने आता दोन्ही काठावर केवळ सिमेंट काँक्रीटचे फौंडेशन शिल्लक आहे. यामुळे एक आवडीचे पर्यटनस्थळ येथे होते, अशी आठवण उरली आहे. या पुलाची पुन्हा निर्मिती करून स्थानिकांसह पर्यटकांनाही दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

                                                                                                                  -बबन शेलार 

- Advertisement -

हेही वाचा – राज्यसभेत संभाजीराजेंचा आवाज झाली शिवसेना, अन्…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -