बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवडूच क्यूट कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचं. दोघांच्या रिलेशनशीपची माहिती मिळाल्यापासून संपूर्ण बॉलिवूडला त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. दोघेही डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र नुकतीच दोघांच्या लग्नाची पक्की तारीख समोर आली आहे. दोघांच्या लग्नाची तारीख ऐकून त्यांचे फॅन्स भलतेच खुश झाले आहेत.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना आणि विकी कौशलने त्यांच्या लग्नाची तारीख जाहिर केलीआहे. येत्या ९ डिसेंबरला विकी कतरिना लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्याचं मोस्ट ट्रेडींग कपल ९ डिसेंबरला राजस्थानच्या एका किल्ल्यावर शाही विवाह करणार आहेत. राजस्थानच्या सिक्स सेंसस फोर्ट बरवाडा येथे दोघे लग्नाचे सात फेरे घेणार आहेत.राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे एक जुना किल्ला आहे ज्याचे रुपांतर रिसोर्टमध्ये करण्यात आले या रिसोर्टवर दोघे हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत.
विकी कतरिनाच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि जवळीचे मित्र उपस्थित राहणार आहेत. ९ डिसेंबरला लग्नविधी पार पडणार आहेत. मात्र त्या आधी ७ डिसेंबरला दोघांचा संगीत सोहळा ८ डिसेंबरला मेहंदी आणि ९ डिसेंबरला लग्नसोहळा पार पडणार आहे.
प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर बॉलिवूडमधील ही सर्वांत ग्रँड वेडिंग सेरिमनी असणार आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. जवळपास २०० माणसे लग्नाला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा – Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विक्की कौशल कतरिनाच्या लग्नाचे सात फेरे ८०० वर्ष जुन्या किल्ल्यात