आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचे समोर येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 90 डॉलर प्रति बॅरल खाली उतरल्या आहेत. 5 सप्टेंबर रोजी ओपेककडून मागणीत होत असलेली घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या सावटाच्या भीतीने ऑक्टोबरपासून उत्पादन 1 लाख बॅरल प्रति दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (petrol diesel price today petrol diesel price mumbai)
कच्च्या तेलाच्या किंमती 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com ने जारी केलेल्या दरांनुसार, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर देशातील राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे 105 92
नागपूर 106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे 106.05 92.58
नांदेड 108.24 94.71
रायगड 105.96 92.47
अकोला 106.05 92.55
वर्धा 106.56 93.10
नंदुरबार 106.99 93.45
वाशिम 106.37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली 105.96 92.54
जालना 107.76 94.22
पेट्रोल आणि डिझेलचे दर इथे पाहा
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
हेही वाचा – अखेर अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात; गुढ कायम