Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन आशा भोसले फक्त उत्तम गायिकाचं नाही तर उत्कृष्ट सुगरणसुद्धा; परदेशात बांधले हॉटेल्स

आशा भोसले फक्त उत्तम गायिकाचं नाही तर उत्कृष्ट सुगरणसुद्धा; परदेशात बांधले हॉटेल्स

Subscribe

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली महाराष्ट्रातील सांगलीमध्ये झाला होता. आशा भोसले यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायन सुरू केले. 1943 साली त्यांनी त्यांचे पहिले मराठी चित्रपटातील गाणे गायले.

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत एकापेक्षा एक गाणी गायली आहेत, शिवाय त्यांनी गायलेली गाणी सुपरहिट सुद्धा ठरली आहेत. मात्र आशा भोसले यांचं स्वप्न फक्त एक उत्तम कूक सुद्धा आहेत. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत स्वतः खुलासा केला होता. आशा भोसले यांना उत्कृष्ट जेवण बनवण्याची सुद्धा आवड आहे. इतकचं नव्हे तर त्यांचे विदेशात हॉटेल देखील आहे.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली महाराष्ट्रातील सांगलीमध्ये झाला होता. आशा भोसले यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायन सुरू केले. 1943 साली त्यांनी त्यांचे पहिले मराठी चित्रपटातील गाणे गायले. तसेच 1948 साली बॉलिवूडमधील ‘सावन आया’ हे गाणं गायलं. त्यानंतर हळूहळू त्यांच्या करिअरला सुरूवात होऊ लागली. हळूहळू त्यांनी मराठी, हिंदीसह इतर भाषांमध्ये देखील गाणी गायला सुरूवात केली. शिवाय आशा भोसले यांनी 22 भाषांमध्ये 11000 पेक्षा जास्त गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कमावलं. आशा भोसलेंच्या या गायन क्षेत्रातील करिअरमध्ये त्यांनी अनेक मोठमोठे पुरस्कार देखील प्राप्त केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

- Advertisement -

मात्र, आशा भोसले केवळ एक उत्तम गायिका नसून त्या एक उत्कृष्ट कूक देखील आहेत. त्यांच्या हातचे जेवण अभिनेते ऋषि कपूर यांना देखील आवडायचे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ऋषि कपूरला त्यांच्या हातचा शामी कबाब, काळी डाळ खूप आवडायची. तसेच त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जर त्यांना गायिका म्हणून करिअर झाले नसते, तर त्या एक उत्तम कूक नक्कीच झाल्या असत्या. मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांचे परदेशात हॉटेलचा व्यवसाय आहे. दुबई आणि कुवैतमध्ये आशाज नावाजे मोठे हॉटेल आहेत. जिथे पारंपारिक भारतीय पदार्थ मिळतात. तसेच त्यांचे हॉटेल अबुधाबी, दोहा, बहरीनमध्ये देखील आहेत. या हॉटेलमधल्या जेवणाती आणि सजावटाची आशा भोसले काळजी घेतात. त्यांनी कूकला जवळपास 6 महिन्यांचे ट्रेनिंग देखील दिले आहे.


हेही वाचा :

सीट-बेल्ट महत्त्वाचा आहे, पण… दंडवसुलीच्या नियमावर पूजा भट्टची प्रतिक्रिया

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -