ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतो. 15 मे रोजी सूर्य मेष राशीतून राशीपरिवर्तन करत वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 15 जून पर्यंत सूर्य वृषभ राशीत राहिल. 1 महिना सूर्य वृषभ राशीत राहिल्याने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार आहे.
सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींना होणार फायदा
- कर्क
वृषभ राशीतील राशी परिवर्तनामुळे कर्क राशीच्या लोकांना खूप लाभ मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदमय जाईल. आर्थिक परिस्थीती उत्तम असेल.
- सिंह
मे 2023 मध्ये होणारे सूर्याचे संक्रमण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभ देणारे ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना खूप यश मिळेल. लोक तुमची मदत करतील. या काळात तुमचा मान-सम्मान वाढेल.
- कन्या
सूर्याचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना मान-सम्मान देईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. उच्च शिक्षणाची संधी मिळेल.
- मकर
सूर्याचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ देणारे ठरेल. नवी नोकरी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रेम प्रकरणात यश मिळेल.
हेही वाचा :