अभिनेत्री पूजा बेदी लवकरच पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. पूजा बेदी वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. घटस्फोटानंतर १५ वर्षांनी तिने हा निर्णय घेतला आहे. पूजा आणि मानेक या दोघांचा साखरपूडा झाला असून त्याचा फोटो पूजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हॅलेंटाइन डे रोजी साखरपूडा करण्यात आला होता. आपल्या लग्नाबद्दल पूजा खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे. मागील अनेक महिन्यांपासून पूजा आणि मानेकचे प्रेमसंबध होते अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
View this post on Instagram
कोण आहे मानेक?
पूजा बेदी आणि मानेक काँन्ट्रेक्टर हे दोघे एकाच शाळेत शिकले आहेत. शाळेत मानेक पूजाचा सिनियर होता. मानेक हा गोव्याला राहतो. मानेक काँन्टेक्टर ५० वर्षाचा आहे. पूजा नेहेमी मानेक सोबतचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करते. २००३ साली फरहान फर्नीचरवाला याच्याशी पूजाचा घटस्फोट झाला होता. १२ वर्षांच्या लग्नानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. फरहान कडून पूजाला दोन मुले आहेत.