घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग पाहाल;...

Lok Sabha 2024 : कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग पाहाल; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

Subscribe

कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम काय असतं ते अनुभवलं, आता मशालीची धग काय असते, ते पाहाल. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजते ते पाहा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधला.

सोलापूर : कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम काय असतं ते अनुभवलं, आता मशालीची धग काय असते, ते पाहाल. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजते ते पाहा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधला. शिवाय, कमळाबाईचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरात येऊन गेले, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर केली. (Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Slams PM Narendra Modi and BJP In Solapur Sabha)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधला.

- Advertisement -

कमळाबाईचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी – उद्धव ठाकरे

“आज सोलापूरात भाकड जनता पक्षाचे नेते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) येऊन गेले. कारण शिवसेनाप्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे. कमळाबाईचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरात येऊन गेले. सध्या मोदी सर्वत्र फिरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोदी फिरत आहेत. लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचे काम करत आहेत. 2014 पासून लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचे काम करत आहेत. 2014 ला लावला 2019 चा गुळ, 2019 ला लावला 2024 चा गुळ आणि आता 2024 ला 2047 चा गुळ लावत आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

‘उद्धव ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गुन्हा दाखल करा’

“उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये यणार आहेत. तर पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाषणाची सुरुवात तुळजा भवानीच्या नावाने करावी. जर भाषणाच्या सुरुवातील पंतप्रधान मोदींनी तुळजा भवानीचे नाव घेतले नाही तर, संपूर्ण महाराष्ट्र समजेल की, महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात आकस आहे. पण तुम्ही जय भवानी म्हणालात तर, तुमच्या नोकराला (निवडणूक आयोग) माझ्या मशाल गीतातील जय भवानीवर घेतलेला आक्षेप बाजूला काढायला सांगा. जर गुन्हा दाखल होणार असेल तर, उद्धव ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गुन्हा दाखल करा. पण तुम्ही जय भवानी म्हणायची महाराष्ट्र वाट पाहतो आहे”, असाही हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.

- Advertisement -

‘कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग पाहाल’

“कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम काय असतं ते अनुभवलं, आता मशालीची धग काय असते, ते पाहाल. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजते ते पाहा. 66 साली शिवसेनेचे जन्म झाला होता. शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांसाठी आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी, महराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला. त्यावेळी मोदी हिमालायता बसलेले असाल किंवा कोणत्या तरी रेल्वे स्थानकात बसलेले असाल. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला वाचवले. जर शिवसेना नसती तर, आता जी 10 वर्ष अनुभवली ती अनुभवली नसती. त्यावेळी तुमच्यासोबत शिवसेना होती म्हणून तुम्ही त्या तख्तपर्यंत पोहचू शकला होता. पण आता शिवसेने नाही तर तुम्ही त्या तख्तापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आम्ही पोहचू देणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

तुमच्या भाजप आता भाकड झाला – उद्धव ठाकरे

“संकट काळात मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणत आहात. पण तुमच्या भाजप आता भाकड झाला आहे. प्रत्येक ठिकाणी पैसे देऊन माणसं गोळा करावी लागत आहेत. पण आमच्या इथे एकही भाड्याने आलेला माणून नाही. यालाच तर प्रेम म्हणतात. सध्या महाराष्ट्रातील सर्व विषय संपले. फक्त महाराष्ट्रात शिवसेना हाच आपला दुश्मन आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली.

‘हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणारे’

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे हे अतिशय जवळचे मित्र आहेत. या दोघांनी राजकारण आणि मैत्रीच भेसळ होऊ दिली नाही. मतभिन्नता होती ती, बाळासाहेब ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी न लपवता सर्वांसमोर मांडली. पण हल्ली कोणाला मित्र म्हणायचं असेल तर, पाठ सांभाळावी लागते. कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणारे आहेत”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – NARENDRA MODI RALLY IN PUNE : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -