घरमनोरंजनजाणून घ्या, साराच्या weight loss प्रवासाबद्दल

जाणून घ्या, साराच्या weight loss प्रवासाबद्दल

Subscribe

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वी तिचे वजन खूप होते. तिला PCOD चा त्रास असल्याने तिची तब्येत वाढून वजन नियंत्रणात नव्हते. या आजाराशी सामना करताना तिचा प्रवास प्रेरणादायी होता

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने केदारनाथ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात साराने सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले होते. सध्या सारा ही सर्वोत्कृष्ट तसेच तंदुरूस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या रोजच्या वर्कआऊटचे आणि फिटनेसचे फोटो शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वी तिचे वजन खूप होते. तिला PCOD चा त्रास असल्याने तिची तब्येत वाढून वजन नियंत्रणात नव्हते. या आजाराशी सामना करताना तिचा प्रवास प्रेरणादायी होता असे म्हणता येईल. तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबतीत तिला तंदुरूस्त राहायचे होते. त्याकरिता तिने योग्य आहार आणि नियमित व्यायाम सुरू केला आणि तिचे ध्येय साध्य झाले.

- Advertisement -

परदेशात शिकत असताना तिचे  वजन ९६ किलो होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचे तिचे स्वप्न होते. त्याकरिता तिने अधिक वाढलेले वजन नियंत्रणात आणण्याचे ठरवले. अलिकडेच सारा एका मुलाखतीमध्ये सांगितले, हार्मोनल डिसऑर्डर असल्याने तिचे वजन नियंत्रणात राहत नव्हते. तेव्हा पासून आता पर्यंतचा वजन कमी करण्याचा प्रवास खूप कठीण होता.

 

View this post on Instagram

 

????

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

- Advertisement -

करण जोहरच्या एका कार्यक्रमात तिने उघडपणे असे देखील म्हटले की, PCOD (Polycystic Ovary Disorder) च्या काळात वजन नियंत्रणात आणणे खूप कठीण होते. त्यावेळी माझे वजन ९६ किलो होते. PCOD हे हार्मोनच्या समस्येसारखे असल्याने वजन सतत वाढत गेले, असा खुलासा केला.

सारा अली खानचा फॅट-टू-फेब अशा बदलचा प्रवास अनेकांना आश्चर्य करणारा होता. परंतु या वर्कआऊट बद्दल बोलताना सारा म्हणाली वजन कमी करण्यासाठी योगा, कथ्थक आणि नियमित व्यायाम करत होती. या व्यतिरिक्त नियमित आपल्या वडिलांसोबत आणि भावासह अनेक खेळ विशेषतः लॉन टेनिस खेळ खेळायची.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -