भारतीय संघाचा तडाखेबाज फंलदाज युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर अनेक दिग्गजांनी युवराजला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. सध्या युवराजचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत युवराज सिंह बॉलिवूडचे कलाकार शक्ती कपूर यांच्यासोबत दिसला आहे. त्यावेळी युवराजने शक्ती कपूरला त्यांचा गाजलेला डायलॉग बोलायला सांगितलं आहे.
युवराज हा मुंबई विमानतळावर शक्ती कपूर यांना भेटला होता. त्या ठिकाणी शक्ती कपूर युवराजचं कौतूक करताना दिसले. त्यानंतर युवराजने शक्ति कपूर यांना त्यांचा गाजलेला डायलॉग बोलायला सांगितला. “आऊ ललिता” हा शक्ती कपूर यांचा सर्वात गाजलेला डायलॉग आहे. त्यानंतर युवराजने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला पसंती दाखवली होती. त्यामध्ये शक्ती कपूर युवराज कौतूक करताना म्हणाले की, युवराज हा उत्तम खेळाडू आहे. त्याने एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारुन संपूर्ण भारतीयांचे मन जिंकले होते. तो क्षण युवराजसाठी न विसरता येणार आहे.
View this post on Instagram
That epic line ! When u get to meet the all time rockstar !!’ Aooooo lalitaaa ??? @shaktikapoor