घरहिवाळी अधिवेशन २०१८आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय - अजित पवार

आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय – अजित पवार

Subscribe

आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार केला आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा विषय एक संवेदनशील बनला आहे. आरक्षणासाठी मराठा तरुण आंदोलन करत आहेत. मराठा तरुणांनी मुंबईच्या आझाद मैदानवर उपोषणही केले. आता याच मुद्याला घेऊन आज विरोधकांनी अधिवेशनात सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, आरक्षणाबाबत सरकारला निर्णय घेता येत नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते विधीमंडळात बोलत होते. आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप पवार केला आहे.

हेही वाचा – दोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देऊ – अजित पवार

- Advertisement -

‘मागास आयोगाचा अहवाल सभागृहामध्ये ठेवा’

सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सरकार पटलावर का ठेवत नाही? असा सवालही अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी सभागृहामध्ये अहवाल ठेवा आम्हांला त्याचा अभ्यास करायचा आहे. हा आमचा अधिकार आहे असे ठणकावतानाच आज मराठा समाज मुंबईत मोर्चा काढत आहेत परंतु सरकार कार्यकर्त्यांची धरपकड करत आहे. मराठा समाज शिस्तबध्द मोर्चे काढत असताना सरकार असं का करत आहे ? असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

हेही वाचा – आरक्षण, दुष्काळ, आदिवासींबाबत सरकारची ठगबाजी – विखे पाटील

- Advertisement -

‘अभ्यास करुन बोलावे’

अजित पवार म्हणाले की, सभागृह नेते चंद्रकांत पाटील हे मुस्लिम समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले असल्याचे म्हणत आहेत. उच्च न्यायालयाने फक्त शिक्षण क्षेत्रात ५ टक्के आरक्षण मान्य केले आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्यावर बोलताना मंत्र्यांनी जरा अभ्यास करून बोलावे, असे अजित पवार यांनी ठणकावले आहे. शिवाय भाजप-शिवसेना धर्माच्या आधारे आरक्षणाच्या मुद्दयाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.


हेही वाचा – इतके लाचार होऊ नका; महाराजांच्या पोशाखाची शान राखा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -