घरताज्या घडामोडीAlibaug : अलिबागमध्ये घरफोडीचे प्रकार सुरूच ; घरातून ७५ हजारांचा ऐवज लंपास

Alibaug : अलिबागमध्ये घरफोडीचे प्रकार सुरूच ; घरातून ७५ हजारांचा ऐवज लंपास

Subscribe

गेल्या एक ते दीड महिन्यापासून या घरफोडी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातला आहे.

अलिबाग तालुक्यात सध्या सातत्याने घरफोडीचे प्रकार सुरू असताना आता पुन्हा एकदा चोंढी येथे आणखी १ घरफोडीची भर पडली आहे. ५ ते ६ नोव्हेंबरच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांची आई घरात झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या मागील लोखंडी दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला आणि ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय श्रीमती मोहिते तपास करीत आहेत.

वारंवार घरफोडीच्या घटना 

गेल्या एक ते दीड महिन्यापासून या घरफोडी करणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातला आहे. अलिबागमध्ये वारंवार घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. २६ ते २८ ऑगस्ट या दरम्यान रेवस बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या कृष्ण संगम सोसायटीमधील गाळा क्रमांक २ येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय, गाळा क्रमांक ३ मधील ओम साई मोटर्स आणि विद्यानगरमधील आदर्श बिअर शॉपीचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्यात आली होती. तर ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान शिवम घरत यांच्या वाडगाव फाटा येथील घरत कलेक्शन या दुकानाचे शटर उचकटून शर्ट, ट्रॅक पँट आदी साहित्य चोरून नेले होते. याच दरम्यान खडताळ पूल बामणोली येथील श्री हनुमान मंदिर आणि थळ टेकडीवरील श्री दत्त मंदिरातून दान पेट्या चोरीला गेल्या होत्या. हे सत्र येथेच थांबले नाही तर ७ ते ८ आक्टोबर दरम्यान कुरूळ येथील करण हार्डवेअर दुकानातून फेन ड्रिल मशीन, रंगाचे डबे आणि रोख रक्कम या चोरांनी लंपास केली होती. घरफोडी, चोरी प्रकरणातील मोटरसायकल, कॉम्प्युटर, कपडे, हार्डवेअर दुकानातील माल, दानपेटी यासह चोरी करण्यासाठी वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली.

- Advertisement -

 


हे ही वाचा – दो कौडी के लोग अपना गुन गाते, संजय राऊतांचे सूचक ट्विट

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -