घरताज्या घडामोडीअंबरनाथमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ला

अंबरनाथमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ला

Subscribe

हल्लेखोर चार तासात गजाआड

संशयास्पद गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करूून पळूूून गेेलेल्या चार जणांना पोलिसांनी अवघ्या चार तासातच गजाआड केले. या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस हवालदार बाळू चव्हाण यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाळू चव्हाण शुक्रवारी रात्री उशिरा ड्युटीवरून बदलापूरला घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका कारमध्ये चार जण संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्यांनी या कारचा पाठलाग केला. अंबरनाथच्या लक्ष्मी नारायण सिनेमागृहाजवळ ही कार अडवली. त्यावेळी कारमधील चौघांनी कारमधून उतरून चव्हाण यांच्यावर तलवारीने हल्ला करून रिक्षातून पळून गेले. या घटनेचे वृत्त समजताच अतिशय वेगवान तपास करून विठ्ठलवाडी व मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या चार तासांत अंकित सिंग, अंकुश सिंग व त्यांच्या दोन साथीदारांना अवघ्या चार तासांत गजाआड केले.

- Advertisement -

हवालदार चव्हाण यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी या चौघांनी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर परिसरात काही चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदार चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -