घरताज्या घडामोडीसर्व आरक्षण रद्द करा, फक्त मेरिटनुसार आरक्षण द्या

सर्व आरक्षण रद्द करा, फक्त मेरिटनुसार आरक्षण द्या

Subscribe

समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावे. सगळेच आरक्षण रद्द करावे, ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो आणि ज्याने कष्ट घेतले; पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते. काहीजण आत्महत्या करतात, अशी खंतही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोर्टात बाजू मांडण्यासाठी कमी पडले, असा आरोप होत आहे. तर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. यातच ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यावरही मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -