घरCORONA UPDATECorona Live Update: पुणेकरांची चिंता कायम!

Corona Live Update: पुणेकरांची चिंता कायम!

Subscribe

रत्नागिरीत ९६ नव्या रुग्णांची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, रत्नागिरी जिल्ह्यात ९६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ४८७ झाली आहे. तर आज दिवसभरात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

पुणेकरांची चिंता कायम!

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल १ हजार ५८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६९ हजार २३५ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज अखेर ५२ हजार ८०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईत एक लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता मुंबईतील तब्बल एक लाख ७० हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये ११३२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २६ हजार ३७१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६९४० वर पोहचला आहे. मुंबईमध्ये ११३२ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ५० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३० पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३० जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. (सविस्तर वाचा)


राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ७१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


पोलीस दलाला करोनाचा विळखा

दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत राज्यातील तब्बल २६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत ६० हजार ९६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४६ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १६ लाख ३९ हजार ६०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात ११ ऑगस्टपर्यंत २ कोटी ६० लाख १५ हजार २९७ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यापैकी मंगळवारी ७ लाख ३३ हजार ४४९ कोरोना चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत २ कोटी ५ लाख १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ७ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी ३४ लाख २३ हजारांहून रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात अमेरिका, ब्राझील आणि भारत या देशातमध्ये कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहे.


राज्यात मंगळवारी ११ हजार ८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८ लाख ३७ हजार ५७८ नमुन्यांपैकी ५ लाख ३५ हजार ६०१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्यात १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -