घरमहाराष्ट्रउदयोन्मुख क्रिकेटपटू तरुणाची गळफास लावून आत्महत्या

उदयोन्मुख क्रिकेटपटू तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

मालाड येथील घटना; पोलिसांची अपमृत्यूची नोंद

उदयोन्मुख क्रिकेटपटू करण राधेश्याम तिवारी या 27 वर्षांच्या तरुणाने सोमवारी रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मालाड परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी करणने त्याच्या काही मित्रांना व्हाईस कॉलसह व्हॉट्सअप मॅसेज करून आपण आयुष्याला कंटाळून गेलो आहे, क्रिकेटमध्ये करिअर होईल, असे वाटत नाही म्हणून तुमची सर्वांची रजा घेतो आणि काही चूक झाली असेल तर माफ करा असा मजकूर दिला होता. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून या घटनेमागे काहीही संशयास्पद नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले.

ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता मालाड येथील सहयोग नगर, गोकुळधाम, कानू कंपाऊंडमध्ये घडली. याच परिसरात करण हा त्याच्या आई-भावासोबत राहत होता. तो चांगला क्रिकेटपटू होता, त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते, त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता, आयपीएलच्या सराव नेटमध्ये तो बॉलिंग करुन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्यात त्याला यश आले नाही. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत तो मित्रांसोबत बाहेर फिरत होता, नंतर तो घरी आला, जेवणानंतर तो त्याच्या पोटमाळ्यावरील रुममध्ये गेला. सव्वादहा वाजता त्याने मित्रांना दोन व्हाईस कॉल केले, त्यानंतर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर त्याने मॅसेजद्वारे आपण आयुष्याला कंटाळून गेलो आहे, क्रिकेटमध्ये करिअर होईल असे वाटत नाही, त्यामुळे मी मानसिक तणावात आहे, तुम्हाला सोडून जातोय, स्वतःची काळजी घ्या असे नमूद करुन त्याने तेथील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. संबंधित मॅसेज त्याचे मित्र शुभम सिंग, आकाश द्विवेदी, पार्थ, किट्टू नावाच्या मित्रांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर शुभमने त्याच्या आईसह भावाला कॉल करुन ही माहिती दिली. या माहितीनंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, करणने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना करणने आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

करणला कोरोना होता का?

शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात येईल. याप्रकरणी त्याच्या आईसह भावाची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही, त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -