घरक्राइमCrime News : बोगस मेलद्वारे 87 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Crime News : बोगस मेलद्वारे 87 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Subscribe

बोगस मेलद्वारे एका नामांकित शाळेची सुमारे ८७ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 82 लाख 55 हजार रुपयांची रक्कम वाचविण्यात यश मिळविले आहे.

मुंबई : बोगस मेलद्वारे एका नामांकित शाळेची सुमारे ८७ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 82 लाख 55 हजार रुपयांची रक्कम वाचविण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम लवकरच संबंधित शाळेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे. यातील तक्रारदार एका नामांकित शाळेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. (Crime News 87 lakhs online fraud through bogus mail)

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यांत त्यांच्या शाळेच्या कॅफेटेरियाचे बांधकाम साहित्य पुरवठा करण्यासाठी त्यांनी युएईमधील एका खाजगी कंपनीशी करार केला होता. यावेळी या कंपनीने पेमेंटसाठी त्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती ईमेलवरुन पाठविली होती. मात्र अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्यासारखा ईमेल आयडी बनवून त्यांना दुसर्‍या बँक खात्याची माहिती दिली होती. या बँक खात्यात तक्रारदारांनी 87 लाख 26 हजार 995 रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र पेमेंट केल्यानंतर संबंधित कंपनीला पैसे मिळालेच नसल्याचे उघडकीस आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : वीज बिल अपडेटच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; मध्यप्रदेशात वांद्रे पोलिसांची कारवाई

अज्ञात सायबर ठगांनी बोगस मेल पाठवून ही फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरळी सायबर सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, एपीआय मानसिंग वचकल, पोलीस हवालदार अभिजीत गोंजारी, संतोष गावडे, शितल सावंत यांनी तपास सुरु केला होता. या पकिज्ञाने तातडीने कारवाई करुन संबंधित नोडल बँक अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या विनंतीनंतर या बँक अधिकार्‍यांनी बँक खात्यातील व्यवहार थांबवून 82 लाख 55 हजार 955 रुपयांची कॅश फ्रिज केली होती. ही रक्कम लवकरच तक्रारदाराच्या शाळेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करणार्‍या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -