पुण्यात काय सभा घेताय…अयोध्येत घेऊन दाखवा, दिपाली सय्यद यांचे राज ठाकरेंना आव्हान

मुंबई, ठाणे, औरंगाबाद नंतर आत्ता पुण्यातही सभा #raj thackeray राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्यांवर बोलणार ? राज ठाकरे आत्ता पुण्यातही सभा घेणार आहेत. पण त्या आधीच शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना आव्हान दिलंय

MNS Raj Thackeray arrange public meeting in Pune to decide Strategy

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पूर्वी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद मध्ये सभा घेतल्या होत्या. आणि आत्ता त्यानंतर राज ठाकरे पुण्यात सभा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान मागच्या तीनही सभांमध्ये राज यांनी भोंगा प्रकरण,हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यासारख्या अनेक मुद्यांवर भाष्य केल होतं. आणि या नंतर या सगळ्यावर मुंबई सह राज्यभरात वादंग सुद्धा निर्माण झाला. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना त्यांच्या पुण्याच्या सभेआधीच टोला लगवला आहे. पुण्यात काय सभा घेताय… अयोध्येत सभा घेऊन दाखवा असे आव्हान दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

राज ठाकरे २१ मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत. आणि त्यांच्या सभेची तयारी सुद्धा झाली आहे पण, शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्या पुण्याच्या  सभेसंदर्भात टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आणि त्यादरम्यान ते पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर २१ मे रोजी होणाऱ्या सभेचं नियोजन सुद्धा करण्यात येईल अशी माहिती मिळतेय.

दरम्यान राज ठाकरे यांची जाहीर सभा हा २१ मे ला पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या मुठा नदी पात्रातील जगेत होनंतर आहे. त्यासंदर्भात मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुलेल्या सूचनेनुसार पुणे शहरात सभेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. पण राज ठाकरेंच्या सभेच्या आधीच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यात त्या म्हणतायत कि सभा करायच्याच असतील तर त्या अयोध्येमध्ये करून दाखवा… पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा सभा घेतात. आणि ते हि जास्त गर्दी करून. असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यामध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळू शकतात. पुण्यात मनसेची पक्षसंघटना भक्कम आहे. त्याच पार्शवभूमीवर पुण्यातील निवणूका समोर ठेऊन त्या संदर्भातील अनेक गोष्टींवर महत्वाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात येईल, तसेच या निमित्ताने पत्रकार परिषद सुद्धा पार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान या सागळ्या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या आहेत अनेक राजकीय नेत्यांनी राज यांच्या झालेल्या सभांवर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. तयच प्रमाणे ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत पण भाजपा चे बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जो पर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येमध्ये येऊ देणार नाही असं म्हटलं होत. दरम्यान २ मे च्या पुण्याच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कोणते मुद्दे त्यांच्या भाषणात अग्रस्थानी असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

 

 

mdsk