घरपालघरकाशीमिरा येथील बारवर पोलिसांचा छापा

काशीमिरा येथील बारवर पोलिसांचा छापा

Subscribe

मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज डान्स बार सुरू असून ते रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत सुरू असल्याचे सांगितले जाते. या बारची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

काशीमिरामधील मुंबई-अहमदाबाद हायवे शेजारी असलेल्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला वेटर सर्व्हिसच्या नावाखाली अश्लिल डान्स करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या साकी ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंट या ऑर्केस्ट्रा बारमध्ये छापा टाकून काशीमिरा पोलीसांनी एकूण १९ जणांना ताब्यात घेत ३ हजार ७० रुपये रोकड जप्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी ही कारवाई केली आहे. मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज डान्स बार सुरू असून ते रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत सुरू असल्याचे सांगितले जाते. या बारची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांना पोलीस व पालिका आणि महसूल यांचाच आशिर्वाद असल्याचे बोलले जाते.

या बारवर कधीतरी पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु त्या कारवाईचे प्रमाण कमी असल्याने ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज डान्स बार हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगितले जाते. काशीमिरा राष्ट्रीय महामार्गासह मिरारोड, भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बार आहेत. या बारमध्ये अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

गुजरात, मुंबई व आसपासच्या परिसरातील व्यापारी ग्राहकांची संख्या मोठी आहे. काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत भारत कंपाऊंडच्या जवळ काशीमिरा येथील साकी लेडीज सर्विस आर्केस्ट्रा बार येथे महिला नृत्य करून हॉटेलमधील ग्राहकांना आकर्षित करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनुसार हजारे यांनी पोलीस पथक तयार करून त्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले. त्या पथकाने बारवर छापा टाकला. यावेळी १ चालक, १ मालक, १ मॅनेजर, १ कॅशियर , २ स्टुअर्ट , २ वेटर व ९ ग्राहक असे एकूण १९ जणांविरोधात भादवि कलम १०९, ११४, २९४, ३४ प्रमाणे काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चालकमालक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा –

शिवसेना देणार सहावा उमेदवार, संभाजीराजेंचा मार्ग खडतर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -