घरक्राइमViral Video : पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

Viral Video : पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडीतून सुटका करुन घेण्यासाठी पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक.

वाहतूक कोंडीतून सुटका करुन घेण्यासाठी एका कार चालकाने आणि त्याच्या सहकार्याने पिसतूल दाखलल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, या गाडीत बसलेला व्यक्ती शिवसैनिक असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

ट्विटरवरुन शेअर केला व्हिडिओ

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे दृश्य असून हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी त्यांनी पिस्तुलचा वापर केला असून या गाडीवर शिवसेनेचा लोगो आहे. शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचा वापर करीत होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी दखल घेतील का,’ असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

शिवसैनिक आपल्याच पक्षाची बदनामी करतोय

जलील यांनी ट्विटर वरुन व्हायरल केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात एकाने शिवसैनिक आपल्याच पक्षाची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. तर जलील यांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांना टॅग करुन रीट्विट केला आहे. मात्र, शिवसेनेकडून यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाडीवर शिवसेनेच्या वाघाचे चित्र असले तरी पिस्तूल दाखवणारे लोक शिवसैनिकच आहेत का? याविषयी अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – “शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -