घरक्राइमPune Crime : पोलीस निरीक्षकाच्या हफ्तेखोरीला कंटाळत व्यावसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Pune Crime : पोलीस निरीक्षकाच्या हफ्तेखोरीला कंटाळत व्यावसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या समोर येत आहे. वारंवार गोळीबार, कोयत्याचा वापर करत गुंडगिरी अशा घटनांमुळे पुणे शहर हे गुन्हेगारीत केंद्रस्थानी आहे. अशातच एका व्यावसायिकाने पोलिस निरीक्षकांच्या हफ्तेखोरीला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या समोर येत आहे. वारंवार गोळीबार, कोयत्याचा वापर करत गुंडगिरी अशा घटनांमुळे पुणे शहर हे गुन्हेगारीत केंद्रस्थानी आहे. अशातच एका व्यावसायिकाने पोलिस निरीक्षकांच्या हफ्तेखोरीला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. व्यावसायिक हा बारमालक असून सत्यम गावडे असे त्याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतू, पेटवून घेण्यापासून त्याला अडवल्याने मोठी दुर्घटना टळली. (pune crime youth attempt to suicide fire in police station)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बारमालक सत्यम गावडे याचा वाघोली येथे बार आहे. खरंतर, नियमानुसार कोणताही बार रात्री दीड नंतर बंद करणे बंधनकारक असते. पण हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल, अशी तंबी लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस निरीक्षकाने सत्यमला दिली होती. इतकंच नव्हे तर, पोलीस आयुक्तांचे आदेश असून, बार बंद ठेवावा लागेल असेही सांगिल्याचा आरोप सत्यमने केला होता.

- Advertisement -

याशिवाय, हफ्ता म्हणून दर महिन्याला पैसे घेत होते असाही आरोप या बारमालकाने केला. तसेच, गेल्या दोन महिन्यांपासून हा हफ्ता पोलीस वाढवून मागत होते. पोलीस रात्री बे रात्री येऊन दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस ठाण्यात डांबून ठेवत होते. खोटे खटले दाखल करत होते. ऐवढेच नाहीतर हॉटेल बंद करण्याची देखील धमकी देत होते. तब्बल 2 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास महिला पोलीस अधिकारी त्याच्या दुकानात येत बंद असलेले दुकान त्यांनी उघडे करण्यास सांगितले. त्यानंतर 2 नंतरही बार सुरू का ठेवतो असे म्हणत त्याला हॉटेल बंद करण्याची धमकी दिली.

वाढीव हफ्ता न दिल्याने पोलीस त्रास देत असल्याचे देखील बारमालकाने सांगितले. अखेर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून या बारमालकाने लोणीकंद पोलीस ठाणे गाठत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी या ठिकाणी उभ्या असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांला हे वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने सत्यमला रोखल्याने दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सत्यमच्या मित्राने मोबाईलमध्ये काढले. मात्र पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त करून सर्व व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NIA : आरोपीला मौन राहण्याचा मूलभूत अधिकार, कोठडीत वाढ करण्यास तेलंगणा हायकोर्टाचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -