घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत खासदार रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत खासदार रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

Subscribe

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सामान्य सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांच्या खासदारकीचे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना खडसे यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यावर रक्षा खडसे यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे संकेत राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. रक्षा खडसे यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर ही जागा आघाडीच्यावतीने एकत्रित लढवून भाजपला जागा दाखवून देण्याचा इरादा राष्ट्रवादीचा असल्याचे सांगितले जाते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेत असल्याच्या पाश्वर्र्भूमीवर जळगावच्या खासदारकीचे काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाल्यावर रक्षा खडसे यांना खासदारकीचा राजीनामा देण्याची अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आली असल्याचे सांगितले जाते. खडसे राष्ट्रवादीत असताना त्यांच्या स्नुषा भाजपत राहून काम करू शकणार नाहीत वा सरकारला जाबही विचारू शकणार नाहीत.

- Advertisement -

पक्षशिस्तीचा भाग म्हणून त्यांची खासदारकीही जाऊ शकते आणि शिस्तभंगाची कारवाई म्हणून सहा वर्षांसाठी निवडणुका न लढवण्याचीही कारवाई होऊ शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत ही जागा आघाडीच्या वतीने लढवण्याचा इरादा राष्ट्रवादीचा आहे. भाजप विरोधी सारे, अशी तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीची असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले. खडसेंची आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीची ताकद यानिमित्ताने भाजपला दाखवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -