घरताज्या घडामोडीरायगडात गिधाडांची पिल्ले आकाशात झेपावणार

रायगडात गिधाडांची पिल्ले आकाशात झेपावणार

Subscribe

सीस्कॅप संस्थेच्या सदस्यांना गिधाडांची काही पिल्ले जमिनीवर पडलेली सापडली.

भारतात गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. गिधाडे म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छतादूत. रायगड परिसरात ‘ लाँगबील व्हल्चर ‘ आणि ‘ व्हाईटबॅक व्हल्चर ‘ अशा गिधाडांच्या दोन जाती आढळतात. या गिधाडांचे संवर्धन करण्याचे काम महाडमधील सीस्कॅप संस्था करते. या संस्थेने वनविभागाच्या सहकार्याने जखमी अवस्थेत सापडलेल्या चार पिल्लांचे संवर्धन केले आहे.ही गिधाडाची पिल्ले आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहेत. ही पिल्ले ३ ऑक्टोबरला जागतिक वन्य दिन सप्ताहाच्या निमित्ताने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत. १२ मार्चला सीस्कॅप संस्थेच्या सदस्यांना गिधाडांची काही पिल्ले जमिनीवर पडलेली सापडली. त्यापैकी सहा पिल्लांचे संगोपन हे वनखात्याच्या परिसरात करण्यात आले.यातील दोन पिल्लांनी सशक्त झाल्यावर स्वत:हून आकाशभरारी घेतली. आता उर्वरित चार पिल्लाचे संगोपन करण्यात आले असून, त्यांना मोकळ्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.

वादळवाऱ्यामुळे गिधाडांच्या घरट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गिधाडांची पिल्ले प्रथमच आकाशभरारी घेण्याचा प्रयत्न करीत असताना जमिनीवर पडून जखमी होतात. सीस्कॅपचे सदस्य या अशा ठिकाणी कायम लक्ष ठेवत असतात आणि त्या पिल्लांचे संवर्धन करतात. सीस्कॅपच्या वतीने सहा ठिकाणी गिधाडांचे अधिवास संरक्षित करण्याबरोबरच त्यांच्या खाद्यासाठी ढोरटाकी व्यवस्था करण्यात येणार आहे.

- Advertisement -

रायगडात गिधाडांचे अस्तित्त्व टिकून !

एकेकाळी रायगड जिल्हा गिधाडांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जात होता. मात्र हे चित्र गेल्या २५-३० वर्षात बदलले आहे.वारंवार उद्धभवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे याशिवाय किटकनाशकेही गिधाडांच्या मुळावर उठली आहेत. प्राण्यांना दिले जाणारे औषध गिधाडांसाठी काहीवेळा विष ठरते.उंच झाडांची कमी झालेली संख्या,अन्नाची कमतरता यामुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते.मात्र ही परिस्थिती बदलण्यात सी-स्कॅप संस्थेला यश मिळत आहे.प्रेमसागर मेस्त्री आणि त्यांचे सहकारी Society for Eco Endangered Species Conservation and Protection (SEESCAP) या संस्थेच्या माध्यमातून रायगडात हे गिधाडांचे अस्तित्व टिकून आहे.

- Advertisement -

भारत देशातून गिधाडांची जवळपास 97 टक्के संख्या संपलेली आहे. देशात गिधाडांच्या ९ प्रजाती आढळतात. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती आपल्या रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढ-या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. 2000 ते 2004 मध्ये चिरगाव याठिकाणी पांढ-या पाठीच्या गिधाडाच्या काॅलनीचा शोध लागला.


हे ही वाचा – college reopen : राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -