घरताज्या घडामोडीST Workers Strike : माणगावच्या संपावरील नऊ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन

ST Workers Strike : माणगावच्या संपावरील नऊ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन

Subscribe

एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करण्याकरिता मागणी करीत गेल्या सोमवारीपासून एस टी कामगारांनी राज्यभर संप पुकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एस टी कामगारांनी पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचे घोषित केले असताना देखील आगारातील वाहतूक ठप्प करून नियमबाह्यरित्या संपात सहभागी होऊन उच्च न्यालायल मुंबई व प्रशाकिय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माणगावच्या नऊ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. रायगड जिल्हयात एकूण आठ एस. टी. आगार आहेत,संपूर्ण रायगड जिल्हयातील सर्व कर्मचार्‍यांनी एस. टी महामंडळ राज्य शासनात विलीन होण्यासाठी मागणी करीत संप पुकारला आहे. संप मागे न घेता प्रशासनाने ही कारवाई केली आहे. त्यामूळे ९ कर्मचार्‍यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. एस टी कर्मचार्‍यांना तसे लेखी आदेश काढण्यात आले आहेत.


हे ही वाचा – राज ठाकरे – शरद पवार भेटीत काय झाल? बाळा नांदगावकरांनी दिली माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -