घरअर्थजगतअक्षयकुमार फोर्ब्सच्या यादीत चौथ्या स्थानावर

अक्षयकुमार फोर्ब्सच्या यादीत चौथ्या स्थानावर

Subscribe

मिशन मंगलचा अभिनेता अक्षय कुमार फोर्ब्सच्या यादीत झळकला आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानावर आहे.फोर्ब्सच्या या लिस्टमध्ये माजी WWE रेसलर आणि हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक हा पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यांची एकूण कमाई ८९.४ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ६३९ कोटी रुपये आहे. तर या यादीत चिनी अभिनेता जॅकी चॅन Jackie Chan) पाचव्या स्थानावर आहे. त्याची एकूण कमाई ५८ मिलियन डॉलर आहे.अक्षय कुमार याने सर्व भारतीय अभिनेत्यांना मागे टाकले आहे. जून २०१८ ते जून २०१९ या काळात अभिनेत्यांच्या कमाईच्या डेटावर ही यादी तयार करण्यात आली.

- Advertisement -

अक्षय कुमार याचे एकूण उत्पन्न ६९ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४८६ कोटी रुपये आहे. त्यामुळे त्याला ४ थे स्थान देण्यात आले आहे. या लिस्टमध्ये टॉप १० मध्ये जागा मिळविणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -