घरअर्थजगतPF Account Balance: 'या' चार सोप्प्या पद्धतीने पीएफ खात्याचा बॅलन्स करा चेक

PF Account Balance: ‘या’ चार सोप्प्या पद्धतीने पीएफ खात्याचा बॅलन्स करा चेक

Subscribe

कर्मचाऱ्यांना आता मोबाईलवरूनही अगदी सोप्प्या पद्धतीने पीएफ अकाउंटमधील शिल्लक रक्कम पाहता येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता सतत पीएफ ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. उमंग या सरकारी अ‍ॅपद्वारे कर्मचाऱ्यांना पीएफ सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामधून कर्मचारी EPF पासबुक चेक करण्याबरोबरच पीएफसंबंधीत अनेक सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये उमंग अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल त्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल.

Umang अ‍ॅपमधून ‘असा’ पाहा पीएफ

१) सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून उमंग अ‍ॅप डाउनलोड करा.

- Advertisement -

२) फोन नंबर रजिस्टर करुन अ‍ॅपवर लॉगिन करा.

३) यानंतर डाव्या साईडच्या सर्व्हिस डायरेक्ट्रीमध्ये जाऊन अ‍ॅपवर लॉगिन करा.

- Advertisement -

४) EPFO शोधून त्यावर क्लिक करा.

५) VIEW पासबुकमध्य़े जाऊन UAN नंबर टाईप करा, यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून पासबुक ओपन करा.

SMS च्या माध्यमातून पाहा पीएफ

१) तुमचा UAN नंबर EPFO अकाऊंटसोबत रजिस्टर करा.

२) यानंतर 7738299899 नंबरवर EPFOHO असा टेक्स मेसेज टाइप करुन SMS करा.

३) या टेक्सट मेसेजमध्ये “EPFOHO UAN” असं गरजेचे आहे.

४) ही सेवा हिंदी,पंजाबी समवेत १० इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Miss Call देऊन चेक करा पीएएफ

१) SMS प्रमाणेच Miss Call च्या साहाय्यानेही PF बॅलन्स पाहता येईल.

२) 011-22901406 या नंबरवर तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल द्या. तुम्हाला लगेच बॅलन्स कळेल.

EPFO Web वरून चेक करा पीएफ

१) UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून EPFO च्या अधिकृत वेबसाईट https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉगइन करा.

२) रजिस्ट्रेशन करा आणि आपले EPFO पासबुक चेक करा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -