घरअर्थजगतInfosys च्या गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत गमावले ४० हजार कोटी

Infosys च्या गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत गमावले ४० हजार कोटी

Subscribe

चार दिवसांच्या सुट्टीनंतर आजा शेअर बाजार (Share Market) सुरु झाला. मात्र, बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. याचा सर्वात जास्त फटका बसला तो इन्फोसीसच्या (Infosys) गुंतवणूकदारांना बसला आहे. बाजार उघडताच इन्फोसिसचे शेअर्स ६ टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर होते. शेअर्सच्या घसरणीमुळे इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांचे काही मिनिटांत ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर इन्फोसिसचे मार्केट कॅप ६,९२,२८१ कोटी रुपयांवर घसरले. सकाळी ९.३० वाजता कंपनीचे शेअर्स ६.७० टक्के कमी म्हणजेच ११७.५५ रुपयांनी १६३१ रुपयांवर व्यवहार करत होते. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात १२ टक्के वाढ नोंदवून ५,६८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५,०७६ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या (जानेवारी-मार्च २०२२) तिमाहीत, कंपनीचे उत्पन्न २३ टक्के ने वाढून ३२,२७६ कोटी रुपये झाले. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते २६,३११ कोटी रुपये होते.

- Advertisement -

सेन्सेक्स १००० अंकानी कोसळला

मुंबई शेअर बाजार आज १ हजार अंकानी कोसळला. तर निफ्टीमध्ये ३०० अंकांची घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम शेअर बाजारावर झाला असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

शेअर बाजारात FMCG, मेटल्स क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा सारख्या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली आहे.

एनटीपीसीमध्ये १.५९ टक्के, टाटा स्टीलमध्ये ०.८७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.४९ टक्के, पॉवरग्रीडमध्ये ०.१७ टक्के, एचयूएलमध्ये ०.१२ टक्के, नेस्लेमध्ये ०.०५ टक्के आणि आयटीसीमध्ये ०.०४ टक्क्यांची तेजी दिसत आहे.


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -