घरCORONA UPDATEभिवंडीतील सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेमार्फत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

भिवंडीतील सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेमार्फत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

Subscribe

कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अशातच या आपत्कालिन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, तळहातावर कमवणारे मजूर, बेघर असलेल्या व्यक्तीना दिवंगत जैतु आहिल्याजी खरे यांच्या स्मरणार्थ युवा समाजसेवक सुरज काळूराम खरे (अध्यक्ष – सर्वोदय अभिनव सहकारी संस्था) यांच्यामार्फत रोज ५०० ते ६०० कुटुंबांना जेवण वाटप होत आहे. तसेच आतापर्यंत ४०० च्या वर जणांना मास्क, ५० लोकांना राशन किट वाटप केले आहे. समाजाचे आपणही काही देणं लागतो या निस्वार्थी आणि स्वच्छ भावनेतून या युवा समाजसेवकानी आपल्या परीने मोलाचे काम आपल्या हाती घेतले आहे.

मागील २७ दिवसापासून भिवंडी येथील सावंदे नरेश ठाकरे चाळ, आंबराई पाडा, पवार वाडी, कदम चाळ, तसेच चावींद्रा ते वंजार पट्टी नाका, खडक रोड दर्गा, नदी नाका, कल्याण नाका, पद्मानगर, भिवंडी बस स्टँड परिसर, झेंडा नाका, खाडीपार (मोसीन नाखुदा चाळ), वेहळे, भाटले या ठिकाणी गरजू व गोरगरिबांना जेवण वाटण्याचे काम केले जात आहे. समाजसेवा म्हणून हे काम केले जात आहे.
यासाठी त्यांना डॉ. सुजित सिंग, निर्मिती फाउंडेशनचे काळुराम खरे व मनोज खरे, तेजस नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेचे पदाधिकारी सनी साळवे, प्रेम देवळीकर, शहाजी भोईर, निकेत नाईक, दर्पण भगत, रुतीक कोट, धिरज खैरनार, भावेश कदम, संदीप व इतर पदाधिकारी ही उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -