घरक्राइमCrime News : म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक; एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक; एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने तरुणीची साडेआठ लाखांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल दळवी या म्हाडा एजंटविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने तरुणीची साडेआठ लाखांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल दळवी या म्हाडा एजंटविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (8.5 lakh fraud on the pretext of Mhada flat )

तक्रारदार तरुणी 29 वर्षांची असून ती कांदिवली येथे राहते आणि एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. याच परिसरात गणेश हा राहत असून तो म्हाडा एजंट म्हणून काम करतो. त्याने तिला कांदिवलीतील महावीरनगरमध्ये असलेल्या म्हाडा इमारतीमध्ये 42 लाखांचा एक फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले. या इमारतीमध्ये चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून त्याने तिला एक फ्लॅट देतो असे सांगून तिला तो फ्लॅट दहा वर्ष विकता येणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे तिने त्याला साडेआठ लाखांचे पेमेंट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan House Firing Case : मुंबई गुन्हे शाखेचे तापी नदी ऑपरेशन यशस्वी; कोणती हत्यारे मिळाली?

तरुणीने पेमेंट केल्यानंतर आरोपीने तिला तिच्या नावाने म्हाडाच्या लेटरहेडवर फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर व्हॉटअपवर पाठवून दिले. त्यात तिच्या फ्लॅटचा क्रमांक 503 होता. फ्लॅटचा ताबा तिला डिसेंबर 2022 रोजी मिळणार होता. त्यामुळे ती म्हाडाच्या इमारतीमध्ये तिच्या फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेली. मात्र तिला तिथे 503 क्रमांकाचा फ्लॅट नसल्याचे समजले.

- Advertisement -

म्हाडा कार्यालयात लेटरविषयी चौकशी केली असता म्हाडाने तिच्या नावावर कुठलाही फ्लॅट ऍलोट केला नसल्याचे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने गणेशकडून पैशांची मागणी सुरू केली, मात्र गणेशने पैसे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी तरुणीने बोरिवली पोलिसांत गणेशविरुद्ध तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून गणेश दळवीचा शोध सुरू केला आहे.


कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून वृद्धाची फसवणूक

मुंबई : कारसाठी घेतलेल्या सुमारे पावणेबारा लाखांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अक्षय संतोष सुतार या शोरुमच्या मालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मुलुंड येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांना एक कार खरेदी करायची होती, यासाठी त्यांच्या चालकाने त्यांची अक्षय सुतारशी ओळख करून दिली. अक्षयचे युनिक मोटर्स नावाचे एक कार शोरुम असून तो त्यांना पंधरा दिवसांत कार डिलीव्हरी करून देईल असे त्याने सांगितले. फेब्रुवारी 2024 तक्रारदार वयोवृद्धाने अक्षयची भेट घेऊन नवीन कारबाबत त्याला सांगितले. यावेळी त्याने त्यांना पंधरा दिवसांत मारुती कंपनीची ऍटिंगा सीएनजी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून पावणेबारा लाख रुपये घेतले. मात्र पंधरा दिवसांत त्याने कारची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे ते अक्षयच्या मुलुंड येथील शोरुममध्ये गेले. तिथे त्यांना त्याचे शोरुम बंद असल्याचे दिसून आले.

चौकशीअंती अक्षयने त्यांच्यासह इतर काही लोकांना पंधरा दिवसांत कार देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले, मात्र कोणालाही कारची डिलीव्हरी न करता त्यांची फसवणूक केल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच वयोवृद्ध व्यक्तीने नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगत अक्षय सुतारविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अक्षय हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -