घरक्राइम14 वर्षांच्या मुलीवर 9 मुलांचा सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांकडून अटक

14 वर्षांच्या मुलीवर 9 मुलांचा सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांकडून अटक

Subscribe

अहवा तालुक्यात अल्पवयीन मित्रांनी मुलीवर प्रथम बलात्कार केला होता, असंही पोलीस निरीक्षक एन. एच. सवसेता यांनी सांगितले. त्याचं झालं असं की, लग्न समारंभ आटोपून तो शेजारच्या गावातून तिच्यासोबत घरी परतत होता. त्या मुलाचे इतर आठ मित्र, जे वाटेत थांबले होते, त्यांनी नंतर त्याला जबरदस्तीने जवळच्या जंगलात नेले, जिथे त्यांच्यापैकी दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

डांग : गुजरातमधील डांग जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेय. बलात्काराची घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडली होती, परंतु अलीकडेच मुलीच्या नातेवाईकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गुन्ह्याचा व्हिडीओ पाहिला आणि पुन्हा एकदा ते प्रकरण तापले. आरोपींपैकी एकाने हे कथित कृत्य त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केले आणि नंतर सोशल मीडियावर पोस्ट केले, असंही एकानं सांगितले.

अहवा तालुक्यात अल्पवयीन मित्रांनी मुलीवर प्रथम बलात्कार केला होता, असंही पोलीस निरीक्षक एन. एच. सवसेता यांनी सांगितले. त्याचं झालं असं की, लग्न समारंभ आटोपून तो शेजारच्या गावातून तिच्यासोबत घरी परतत होता. त्या मुलाचे इतर आठ मित्र, जे वाटेत थांबले होते, त्यांनी नंतर त्याला जबरदस्तीने जवळच्या जंगलात नेले, जिथे त्यांच्यापैकी दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. नऊ आरोपींपैकी सहा 20 ते 22 वयोगटातील असून, तीन अल्पवयीन आहेत. तसेच एका आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि काही लोक त्या बाजूने येत असल्याचे पाहून सर्व मित्र पळून गेले.

- Advertisement -

बलात्कारानंतर धमकी दिली

“मुलीला या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची त्यांनी धमकी दिली,” असे अधिकाऱ्याने सांगितले. मुलगी दोन महिने गप्प बसली. अलीकडेच तिच्या एका नातेवाईकाने सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला आणि तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नंतर ते पोलिसांकडे गेले आणि 23 डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला. सर्व नऊ आरोपींना 24 डिसेंबर रोजी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन अल्पवयीन मुलांच्या पालकांना जामीन मिळाला, तर सहा जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

या कलमान्वये गुन्हा दाखल

आरोपींविरुद्ध 376 (d) (अ) (अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार), 506 (2) (गुन्हेगारी धमकी), 120 (ब) (गुन्हेगारी कट) आणि 114 (त्यावेळी गुन्ह्याला प्रोत्साहन देणाऱ्याची उपस्थिती) असे आरोप आहेत. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -