घरक्राइमAmazon वरून सुरु होता गर्भपात औषध विक्रीचा गोरखधंदा; अन्न आणि औषध प्रशासनाकडून...

Amazon वरून सुरु होता गर्भपात औषध विक्रीचा गोरखधंदा; अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई

Subscribe

अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग अॅपच्या माध्यमातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. याप्रकरणी अॅमेझॉनविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याच आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत हा अवैध्य औषध विक्राचा कारभार उलथलवून लावला आहे. गर्भपातासंबंधीत औषधांच्या विक्रीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय गर्भपातासंबंधीत औषधांची विक्री करणे हा भारतात कायद्याने गुन्हा आहे. मात्र अॅमेझॉन वेबसाईटवर या औषधांची खुलेआम विक्री सुरु असल्याचे आढळले.

ऑनलाईन पोर्टलवर देखील डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गर्भपातासंबंधीत औषधांच्या विक्रीसाठी कायदेशीर परवानगी लागते. मात्र अॅमेझॉनवर कोणत्याही परवानगी शिवाय या औषधांची विक्री सुरु असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अ‍ॅमेझॉनवर गर्भपात करण्यासाठीची औषधे ऑनलाईन मागवली. यानंतर ही औषधे कुरिअरद्वारे उपलब्ध झाली. यानंतर अन्न आणि प्रशासनाने अ‍ॅमेझॉन विरोधात गुन्ह्याची नोंद केली. गर्भपाताच्या औषधांची (MTP Kit) विकण्यासाठी विक्रेत्यांना त्याचे प्लॅटफॉर्म वापरण्याची जाहिरात आणि परवानगी देण्यासाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनवर ‘ए केअर'( A care) या ब्रँडच्या नावाच्या कंपनीकडून गर्भपाताची औषधं म्हणजेच एमटीपी किटची (MTP Kit) विक्री केली जात होती.  औषधांचे अनेक दुष्परिणाम अनेक असल्यामुळे विना प्रीस्क्रिपशन शिवाय विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे आता अॅमेझॉनसह ए केअर कंपनीविरोधातही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

- Advertisement -

गुप्तचर शाखेचे सहाय्यक आयुक्त गणेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन पोर्टलवर अनेक नियमांचे उल्लंघन करून औषधांचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकार आणि नियुक्त प्राधिकरणांनी औषधे आणि औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी कोणतेही नियम निश्चित करण्यात आलेले नाहीत’


पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; 12 लाखांचे ड्रग्ज साठा जप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -