घरक्राइमCrime : एमडी-हेरॉईनसह सातजणांच्या टोळीस अटक; 1 कोटी 36 लाखांचा ड्रग्जचा साठा...

Crime : एमडी-हेरॉईनसह सातजणांच्या टोळीस अटक; 1 कोटी 36 लाखांचा ड्रग्जचा साठा हस्तगत

Subscribe

एमडी-हेरॉईन ड्रग्जप्रकरणी सातजणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 36 लाखांचे ड्रग्ज जप्त केले असून अटकेनंतर या सातजणांना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : एमडी-हेरॉईन ड्रग्जप्रकरणी सातजणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 36 लाखांचे ड्रग्ज जप्त केले असून अटकेनंतर या सातजणांना किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुर्ला येथे काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तीन आरोपींना अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी साठ ग्रॅम वजनाचे सुमारे बारा लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. दुसर्‍या कारवाईत कांदिवली युनिटच्या अधिकार्‍यांनी मालाड आणि वसई येथून चारजणांच्या एका टोळीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 310 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचा हेरॉईनचा साठा जप्त केला. या हेरॉईनची किंमत 1 कोटी 24 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन सातही आरोपींना अटक केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Bribery case : लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; एक लाख घेताना रंगेहाथ पकडले

अटकेनंतर या सातजणांना आज दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चालू वर्षांत पोलिसांनी हेरॉईन तस्करीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करून आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 138 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत 4 कोटी 22 लाख रुपये आहे. तसेच एमडी ड्रग्ज तस्करीत सोळा गुन्हे दाखल करून 46 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 22 कोटी 92 लाखांचा साडेअकरा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

- Advertisement -

कारची धडकेत दोन अल्पवयीन मुली गंभीर जखमी

मुंबई : कारची धडक लागून दोन अल्पवयीन मुली गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी महालक्ष्मी मंदिराजवळील रस्त्यावर घडली. ऐशानी जाधव आणि जान्हवी कनोजिया अशी या दोन मुलींचे नावं असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी चौदा वर्षांच्या ऐशानी आणि जान्हवी या महालक्ष्मी मंदिराजवळील रस्ता क्रॉस करत होत्या. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका कारने या दोघींना धडक दिली. अपघातात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या दोन्ही मुलींना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजमध्ये एका भरवेगात जाणार्‍या कारने या दोन्ही मुलींना धडक दिल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावर पडण्यापूर्वी त्या दोघीही हवेत उंच फेकल्या गेल्या. अपघातानंतर कारचालक जखमी मुलींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. त्यामुळे या कारचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान या अपघाताची महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे. सायंकाळी त्यांनी नायर रुग्णालयात जाऊन जखमी मुलींची विचारपूस केली.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -