घरक्राइमPune Crime: भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवलं; कारण वाचून व्हाल थक्क

Pune Crime: भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवलं; कारण वाचून व्हाल थक्क

Subscribe

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाडेकरूने घरमालकाचा एका क्षुल्लक कारणावरून जीव घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे: पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाडेकरूने घरमालकाचा एका क्षुल्लक कारणावरून जीव घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 ते दीडच्या सुमारास उरशी देवाची येथील खंडोबाचा मळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी भाडेकरूला अटक केली असून, लोणी काळभोर पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime Tenant drowns landlord in water tank Because you will be surprised to read)

दादा ज्ञानदेव घुले ( वय 50 रा. खंडोबाचा मळा, उरळी देवाची) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे ( वय 37, रा. खंडोबा माळ. ता. हवेली, मूळ रा. सोलापूर ) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी प्रथमेश संतोष घुले ( वय 19, रा. घुले वस्ती, मांजरी) यांनी तक्रार नोंदवली होती.

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धोत्रे हा दादा घुले यांचा भाडेकरू आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारू प्यायले होते. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दाद घुले यांनी मोटारसायकल सुरू करून तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करून ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि संतोष धोत्रे याने दादा घुले यांना मारहाण करुन पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

संध्याकाळपर्यंत दादा घुले दिसले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यावेळी पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे समोर आले. याप्रकरणी संतोष धोत्रे याला पोलिसांनी अटक करून, मंगळवारी रात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक एस. खैरनार पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

गाड्यांची झाली होती तोडफोड 

पुण्याच्या वारजे परिसरात एका टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. अलीकडेच या परिसरात वाहने पेटवण्यात आली होती. त्यामुळे येथे दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश कम्पले ऊर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर या संशयितांना अटक केली आहे. अभिजीत विभिषण धावने (30) याने या प्रकरणी तक्रार दिली होती. या टोळक्याने त्याच्याकडील रोकड लूटली होती

(हेही वाचा: प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे बाईंनी केली शिक्षा अन् चिमुकला जीवानिशी गेला; काय आहे प्रकरण? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -