घरदेश-विदेशBJP Vs Congress : ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलंय; मोदींच्या 'त्या' दाव्यावर काँग्रेसचा...

BJP Vs Congress : ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलंय; मोदींच्या ‘त्या’ दाव्यावर काँग्रेसचा मिश्किल टोला

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 370 पार, तर एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याचपार्श्वभूमी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मिश्किल टोला लगावला आहे. ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलय, असे त्यांनी म्हटले. (BJP Vs Congress Something hidden in EVM Congress hard hitting on Narendra Modi claim)

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला की, मोदींना निवडणुकीपूर्वी कसे कळले की, 370 जागा मिळतील? त्यांनी कलम 370 हटवले आहे, याचा अर्थ त्यांना 370 जागा मिळतील, असे त्यांना वाटत असेल, पण मला वाटते की, ईव्हीएममध्ये काहीतरी रहस्य दडलेले आहे. जर देशातील नेता निवडणुकीपूर्वी असे विधान करत असेल तर जनतेचा मतदानाचा हक्क कसा जपला जाईल? याबद्दल माझ्या मनात शंका आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

अधीर रंजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनीही मोदींच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीची सध्या गरज नाही. त्यांना आधीच 400 जागा मिळाल्या आहेत, मग निवडणुकीची गरज काय? लोकशाहीत जनताच सर्व काही ठरवते. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, देशातील जनता या सरकारला बदलण्याचा आणि हटवण्याचा निर्णय घेईल, कारण हे सरकार हुकूमशाही सरकार आहे, असा आरोप केसी वेणुगोपल यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

मोदी काय म्हणाले?

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना मोदी म्हणाले की, “भगवान रामाचे राम मंदिर बांधले आहे, जे भारताच्या महान परंपरेला नवीन ऊर्जा देत राहील. त्यामुळे आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त 100 दिवस बाकी आहेत. संपूर्ण देश म्हणत आहे की, यावेळी आम्ही 400 चा आकडा पार करू. मात्र मी आकड्यांमध्ये जाणार नाही, पण देशाचा मूड मी पाहू शकतो. यामुळे एनडीए 400 जागा पार करेल आणि भाजपाला 370 जागा मिळतील, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -