घरक्राइमनात्याला काळिमा... मुलीला विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ; सावत्र बापाचा अत्याचार

नात्याला काळिमा… मुलीला विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ; सावत्र बापाचा अत्याचार

Subscribe

नराधम बाप हा आपल्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करत होता. तिला विवस्त्र नाचवून तिचे व्हिडीओ बनवत होता. रोजरोजच्या होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून अखेर या मुलीने पोलीस ठाणं गाठलं आणि बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित मुलीने तिच्या सावत्र बापाचे कारनामे चव्हाट्यावर आणले आहेत. (The relationship is blackened a video made of a girl dancing naked Abuse by stepfather)

नराधम बाप हा आपल्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करत होता. तिला विवस्त्र नाचवून तिचे व्हिडीओ बनवत होता. रोजरोजच्या होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून अखेर या मुलीने पोलीस ठाणं गाठलं आणि बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरु केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसंच, तिला विवस्त्र करत तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

बलात्काराच्या 97 घटनांमध्ये नराधम परिचयातीलच

एनसीआरबीच्या एका अहवालातून बलात्काराच्या एकूण घटनांपैकी 97 टक्के घटनांमधील आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या 2022 च्या आकडेवारीनुसार 97 टक्के प्रकरणात आरोपी हा पीडितेच्या परिचयातीलच असल्याची माहिती आहे. तर 2021 मध्ये 31 हजार 677 प्रकरणापैकी 30 हजार 571 प्रकरणात आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच होता. याच प्रकरणातील 15 हजार 196 प्रकरणातील आरोपी हे मित्र, शेजारी किंवा नातेवाईक आहेत. यातून हे सिद्ध होते की, महिलांना त्यांना अपरिचित व्यक्तींपेक्षा त्यांच्या परिचित असलेल्यांपासूनच अधिक धोका आहे. कारण ते त्यांच्याशी सावधगिरी बाळगत नाहीत.

- Advertisement -

(हेही वाचा: दिल्ली पुन्हा हादरली! फक्त 350 रुपये लुटण्यासाठी अल्पवयीन मुलाने चाकूने केले 60 वार )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -