घरदेश-विदेशपाकिस्तानी विद्यार्थीनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पाकिस्तानी विद्यार्थीनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Subscribe

पाकिस्तानी विद्यार्थीनी यूक्रेन आणि रशियामधील चालू असणाऱ्या युद्धामध्ये यूक्रेन येथील कीव येथे अडकली होती. ती भारतीय दूतावासाच्या मदतीने सुरक्षित जागे पोचू शकली.

सध्या जगभरात यूक्रेन आणि रशियाच्या युद्धाची चर्चा सुरू आहे, अनेक देश यूक्रेनबद्दल सहानभुती दाखवत आहेत, तर काही देश रशिया बाबतीत राग व्यक्त करत आहेत. या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले आहे. आत्तापर्यंत १६००० हून जास्त विद्यार्थी भारतात परतले आहेत.

यादरम्यान यूक्रेनमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थीनीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. खरंतर ती विद्यार्थीनी यूक्रेन आणि रशियामधील चालू असणाऱ्या युद्धामध्ये यूक्रेन येथील किव येथे अडकली होती. ती भारतीय दूतावासाच्या मदतीने सुरक्षित जागी पोहोचू शकली. अशा वेळी विद्यार्थीनीने एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय दूतावासाचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत.

- Advertisement -

या पाकिस्तानी विद्यार्थीनीचं नाव अस्मा शफीक असून ती व्हिडिओद्वारे म्हणाली की, मी पाकिस्तानातून आहे, मी भारतीय दूतावासाचे आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला युद्धासारख्या कठीण परिस्थितीतून सुखरूप सोडवले. मी भारताच्या पंतप्रधानांचे सुद्धा आभार मानते. आमची मदत करण्यासाठी धन्यवाद, भारतीय दूतावासामुळे आम्ही आमच्या घरी सुरक्षित पोचू शकलो.

भारत चालवतोय ऑपरेशन गंगा

- Advertisement -

रशिया आणि यूक्रेनमध्ये भीषण युद्ध चालू आहे, अशावेळी भारतातील विद्यार्थ्यांना बरोबरंचं जगातील अनेक देशांतील नागरिक अडकले आहेत. केंद्र सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवत आहे. यूक्रेनमधील किव, खारकीव शहरामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणलं जात आहे.


हेही वाचा – Ukraine-Russia War: युद्धात रशियाने 12 हजार सैनिक गमावले, युक्रेनचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -