घरदेश-विदेशसिक्किममध्ये राजकीय भूकंप; १० आमदारांचा भाजपात प्रवेश

सिक्किममध्ये राजकीय भूकंप; १० आमदारांचा भाजपात प्रवेश

Subscribe

सिक्किममध्ये राजकीय भूकंप आला आहे. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट'च्या १० आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी भाजपता प्रवेश केला. भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभरात सुरु असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. भाजपने कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या १२ आमदारांना पक्षात ओढले. त्यानंतर गोव्यातही अशाप्रकारचे तोडाफोडीचे राजकारण भाजपकडून केले गेले. आता गोवा आणि कर्नाटक नंतर भाजपने सिक्किम राज्यात तोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. ‘सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट’च्या १० आमदारांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

- Advertisement -

पक्षांतर झाल्यानंतर जगत प्रकाश नड्डांची घेतली भेट

ईशान्य भारतातील सिक्किम राज्यात आज भारतीय जनता पक्षाने मोठी कामगिरी फत्ते केली आहे. ‘सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट’च्या १० आमदारांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रीय सरचिटणीस आणि ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव, खासदार अनिल बालुनी यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ‘सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट’च्या १० आमदारांनी कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली.

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटकडे आता फक्त ४ जागा

नुकत्याच पार पडलेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत ‘सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ला १७ जागा तर ‘सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट’ला १५ जागा जिंकता आल्या. मात्र ११ आमदारांच्या पक्षांतरानंतर सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटकडे फक्त ४ जागा शिल्लक राहिल्या आहेत. यासोबतच सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने लोकसभाची एक जागा जिंकली. सिक्कीम विधानसभेत एकूण ३२ मतदारसंघ आहेत. बाईचुंग भुतियायांच्या हमारो सिक्कीम पक्षास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये संचार करण्याचे स्वातंत्र्य द्या’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -