घरदेश-विदेशदुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

Subscribe

भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुचाकीने ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. घटनेनंतर तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूग्राम येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण दिल्लीयेथील कुंडली-मनेसर-पलवल महामार्गावरुन जात असताना हा अपघात झाला. अतिरक्तस्त्रावाने या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संचित ओबोरॉय असे या तरुणाचे नाव असून तो दिल्ली येथील रहिवाशी आहे. रवीवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास बाईक राईडिंग साठी त्याने घर सोडले. आपल्या मित्रांबरोबर बाईक राईडिंगला जात असल्याचे त्याने घरी सांगितले होते. महार्गावर भरधाव वेगात गाडी चालवत असताना गाडीवरचा ताबा सुटून त्याने ट्रकला धडक दिली.

या पूर्वी झालेल्या घटना
महामार्गावर भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे होणारे अपघाताची संख्या वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होतोय. मागील आठवड्यातच एका बी टेक अभियंता दिपक पुनधिर (२८) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गुरुग्राम-फरीदाबाद महामार्गावर ही घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -